वृक्षरोपन कार्यकम (15 August 2021)

आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून न भूतो न । भविष्यति असा समारोह सावळविहिर खुर्द गावच्या जि. प. शाळेच्या भव्य प्रांगणात विविध वृक्षांच्या साक्षीने गावातून शाळेपर्यंत वृक्षदिंडी काढून , श्री साईभक्त  लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट,शिर्डी व साई 9 ग्रुप च्या वतीने शाळेत व गावात भव्य वृक्षारोपनाचा कार्यकम आयोजित केला ,

यावेळी श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट,शिर्डी च्या ट्रस्टी श्रीमती. संगीता अरूणराव  गायकवाड यांनी  प्रत्यक्ष वृक्ष लागवड करुन शाळेतील लहान मुलाना त्यानी  झाडांची महत्व संगितले . जो झाड लावतो,तो एक आशा लावतो असा संदेश मुलाना दिला.

यावेळी ट्रस्टच्या ट्रस्टी यानी पत्रकात सांगितले की ट्रस्ट च्या वतीने वृक्ष लागवड ही आम्ही निरंतर चालू ठेउन गावागावात त्याचा संदेश देऊ.

कोविड काळात सोशल नियमांचे पालन करुन सदर कार्यक्रम उत्साहाने पार पडले.

 या शुभ प्रसंगी ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या विश्वस्त सौ.संगीता अरूणराव गायकवाड, साई 9 ग्रुप चे संचालक श्री.साईराज गायकवाड, सौ.स्नेहल गायकवाड,यशराज गायकवाड, व यश राजपूत, श्री.किरण पारखे

तसेच सावळविहिर खुर्द गावचे सरपंच श्री अशोकराव जमधडे,सौ सपनाताई सुधीर वर्पे-उपसरपंच,श्री महेश जमधडे-सदस्य,श्री दत्तात्रय क्षीरसागर-सदस्य,श्री शरद भदे- सदस्य,श्री सुधाकर चव्हाण माजी सरपंच,श्री संदिप आरणे,श्री सुधीर वर्पे,श्रीमती.टेमक मॅडम- ग्रामसेविका,श्रीमती.सांगळे मॅडम मुख्याध्यापिका,श्री संजय त्रिभुवन सर,श्री विलास आगलावे सर,श्री.दत्तात्रय खंडिझोड सर,श्री.संदीप गाडे सर व ग्रामस्थ आदी उपस्थीत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top